गेवराईत बेशिस्त पार्किंगचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST2020-12-27T04:25:03+5:302020-12-27T04:25:03+5:30
तारांमुळे अपघातास निमंत्रण बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, स्वराज्यनगर, बार्शी नाका, नगर नाका, एमआयडीसी परिसराला वीज ...

गेवराईत बेशिस्त पार्किंगचा त्रास
तारांमुळे अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, स्वराज्यनगर, बार्शी नाका, नगर नाका, एमआयडीसी परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. अनेकांच्या घरांवरून, तर काहींच्या घरांसमोरून या तारा गेल्या असून, यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांतील तारा जीर्ण झाल्या असून, महावितरणने या तारा बदलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बीड शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता
बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, जिजामाता चौक, मोंढा रोड, सुभाष रोड, माळी वेस, दत्तनगर, धोंडीपुरा, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला दिसतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्याची मागणी आहे.