पेठ भागात अवैध गतिरोधकांमुळे त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:02+5:302021-02-05T08:26:02+5:30
भाजी मंडईतील कोंडी हाटेना बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविववारी आठवडा बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व ...

पेठ भागात अवैध गतिरोधकांमुळे त्रास
भाजी मंडईतील कोंडी हाटेना
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविववारी आठवडा बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
अंबाजोगाई : आधार लिकिंग व आणि तांत्रिक कारणांमुळे अंबाजोगाई तालुक्यात अद्यापही अनेक शेतकरी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्यांची आधार लिकिंग होत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत.
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगारनिर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गावरस्ते, शिवरस्ते यांची कामे सुरू केली, तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध होईल. रोजगाराची उपलब्धी होईल. यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांतून होत आहे.