दोन दुचाकीसह ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:13+5:302021-02-05T08:22:13+5:30

दोघे गंभीर जखमी : दुचाकीस्वाराला वाचविताना ट्रॅक्टर खड्ड्यात पलटला केज : दोन दुचाकी व ट्रॅक्‍टरचा तिहेरी अपघात ...

Triple accident of a tractor with two bikes | दोन दुचाकीसह ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात

दोन दुचाकीसह ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात

दोघे गंभीर जखमी : दुचाकीस्वाराला वाचविताना ट्रॅक्टर खड्ड्यात पलटला

केज : दोन दुचाकी व ट्रॅक्‍टरचा तिहेरी अपघात होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

केजपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कळंबकडे जाणाऱ्या रस्त्यावर १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान हा अपघात झाला.

या अपघातात बंडू जाधव (४९ रा. शेलगाव गांजी ता. केज) आणि गणेश बंडू खरमाटे (४०, रा. भोई गल्ली, कळंब) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बंडू जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे, तर गणेश खरमाटे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती रस्त्याने पायी फिरणारे इंदाणी यांनी केज पोलीस व रुग्णवाहिकेला दिली. माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, उपनिरीक्षक श्रीराम काळे, शिवाजी शिनगारे, अमोल गायकवाड, जीवन करवंदे, अशोक गवळी, अनिस शेख, हनुमंत चादर, राहुल नाडागुडे, चालक हनुमंत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

१०८ लवकर पोहोचली नाही

अपघातातील जखमींना तात्काळ उपचार करता येण्यासाठी १०८ या रुग्णवाहिकेस संपर्क केला. मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब लागत असल्यामुळे रमेश तात्या गालफाडे मित्रमंडळाची रुग्णवाहिका बोलावून त्यातून एका जखमीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

दुचाकी (क्र.एमएच २३/एचके७८८९) आणि दुसरी दुचाकीची (एमएच ४४/एन५१४६) समोरासमोर धडक झाली. त्यानंतर दोघांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला (ट्रॉली नं. एमएच ३३/४८६३) एक जण धडकला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरदेखील रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन पलटला.

Web Title: Triple accident of a tractor with two bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.