जिवे मारण्याचा प्रयत्न करून रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:57+5:302021-08-28T04:37:57+5:30
शिरूर कासार : तालुक्यातील मानूर येथे मजुराचे पैसे वाटप करण्यासाठी गेलेल्यास २५ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मानूर चौकात ...

जिवे मारण्याचा प्रयत्न करून रोकड पळवली
शिरूर कासार : तालुक्यातील मानूर येथे मजुराचे पैसे वाटप करण्यासाठी गेलेल्यास २५ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मानूर चौकात अडवून ४२ हजारांची रोख रक्कम पळविली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेरखा समशेरखा पठाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ईलीयास प्यारेमिया शेख, सद्दाम शेख,अमोल नागरगोजे, उद्धव नागरगोजे, योगेश बडे (रा.बडेवाडी) यांनी फिर्यादी व त्याचा पुतण्या आगाखा पठाण हे मजुरांचे पैसे देण्यासाठी मानूर चौकात उभे असताना वरील आरोपींनी संगनमताने आगाखा पठाण यास लोखंडी रॉड, तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यावेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याच्या हातातील फिर्यादीचे हातातील ४२ हजार रुपयांची रोकड पळवून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार हे करत आहेत.