राजीव सातव यांना जिल्हा काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:34 IST2021-05-18T04:34:33+5:302021-05-18T04:34:33+5:30

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल आणि आश्वासक नेतृत्व गमावले आहे. त्यांचे सर्व ...

Tribute to Rajiv Satav on behalf of District Congress | राजीव सातव यांना जिल्हा काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

राजीव सातव यांना जिल्हा काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल आणि आश्वासक नेतृत्व गमावले आहे. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. ते भारतीय राजकारणाचा एक सुसंस्कृत चेहरा होते, अशा शब्दांत राजकिशोर मोदी यांनी दिवंगत खा. सातव यांच्या आठवणी जागवत शोकभावना व्यक्त केली. १७ मे रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक मनोज लखेरा, सुनील व्यवहारे, राणा चव्हाण, भारत जोगदंड, दिनेश घोडके, जावेद गवळी, अमोल मिसाळ, सचिन जाधव हे उपस्थित होते.

===Photopath===

170521\avinash mudegaonkar_img-20210517-wa0065_14.jpg

Web Title: Tribute to Rajiv Satav on behalf of District Congress