संगीत पूजेतून मृदंग महर्षींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:36+5:302021-01-13T05:28:36+5:30
ज्ञानाईमध्ये गुरू-शिष्याचा सामूहिक पखवाज नाद शिरूर कासार : पखवाजवादन क्षेत्रातील ऋषितुल्य वै. पद्मश्री शंकरबापू आपेगांवकर यांच्या ...

संगीत पूजेतून मृदंग महर्षींना आदरांजली
ज्ञानाईमध्ये गुरू-शिष्याचा सामूहिक पखवाज नाद
शिरूर कासार : पखवाजवादन क्षेत्रातील ऋषितुल्य वै. पद्मश्री शंकरबापू आपेगांवकर यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील ज्ञानाई शास्त्रीय संगीत विद्यालयात संगीत पूजा करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्ञानाईमधील गुरू-शिष्यांनी सामूहिक पखवाज नाद बापूंना समर्पित केला.
वै. पद्मश्री शंकरबापू आपेगांवकर यांच्या अथक परिश्रमातून शास्त्रीय पखवाज व धृपदधमार गायन शैली महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झाली. त्यांनी आपले जीवन पखवाज सेवेत समर्पित केल्यामुळे भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले. ह.भ.प. गुरुवर्य वै. बंकटस्वामी महाराज यांचे खास शिष्य म्हणून त्यांची ख्याती होती. शिवाय श्रीक्षेत्र भगवानगड चे महंत वै. भिमसिह महाराज यांच्याबरोबर पारमार्थिक स्नेह संबंध होते.
याच परंपरेत पं. उध्दवबापू आपेगांवकर यांचे शिष्य तालमणी हरिप्रसाद गाडेकर यांच्या ज्ञानाई शास्त्रीय संगीत विद्यालयात शनिवारी वै. पद्मश्री शंकरबापू आपेगांवकर यांना संगीत कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व संगीत साधकांनी आपली सेवा समर्पित केली. यात ऋषिकेश कानडे, रोहीत गाडेकर, मयुर दगडे, साईराज गिरी, आदर्श लाड, रितेश लाड, ओम खेडकर, सार्थक कुलकर्णी, समर्थ काटकर, सुमंत गाडेकर, यश ढाकणे, विवेक बडे, सोहम कापरे, जयदीप सव्वासे, ऋषिप्रसाद गाडेकर, विजय काटे, पवन कनुजे, विठ्ठल आंधळे,अभिजीत ढाकणे, ज्ञानेश्वर बडे, शिवाजी करांडे, कृष्णा काळे, अशोक हरिदास,समर्थ थोरात, पद्माकर कुलकर्णी, साक्षी केदार,साक्षी ढाकणे, सृष्टी बडेसह सर्व साधकांनी आदरांजली वाहिली.