ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या अविनाशच्या आई-वडिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST2021-07-22T04:21:15+5:302021-07-22T04:21:15+5:30
बीड : जपानमधील टोकियो येथे २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा आहेत. या स्पर्धेकरिता ...

ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या अविनाशच्या आई-वडिलांचा सत्कार
बीड : जपानमधील टोकियो येथे २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा आहेत. या स्पर्धेकरिता बीड जिल्ह्यातून निवड झालेल्या अविनाश साबळे यांची आई वैशाली आणि वडील मुकुंद साबळे यांचा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, योगेश साबळे, मांडवाचे सरपंच अशोक मुटकुळे, लेखाधिकारी बी. बी ढोले, क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, राजेंद्र खेडकर, योगेश आवढाळ, रमाकांत डिंगणे, योगेश करांडे, ज्ञानेश्वर धंडारे, सचिन जाधव, किशोर काळे, रवि घुमरे आदी उपस्थित होते.
200721\561020_2_bed_14_20072021_14.jpg
अविनाश साबळे याच्या आई-वडिलांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर आदी.