नदीपात्रातून करावी लागते वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:17+5:302021-06-18T04:24:17+5:30

धारूर तेलगाव रस्त्यालगत अरणवाडी साठवण तलावाजवळच्या रत्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. जून संपत आला तरी हे ...

Transportation has to be done through river basin | नदीपात्रातून करावी लागते वाहतूक

नदीपात्रातून करावी लागते वाहतूक

धारूर तेलगाव रस्त्यालगत अरणवाडी साठवण तलावाजवळच्या रत्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. जून संपत आला तरी हे काम मंदगतीने चालूच आहे. पाऊस पडला की नदीला पाणी येते. त्यामुळे नदीमधून केलेला पर्यायी रस्ता हा पूर्ण पाण्याखाली जातो. डोंगर माथ्यावर पाऊस पडला की नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. परिणामी वाहनचालकांना कसरत करत पाण्यामधून रस्ता शोधावा लागतो. तलावाचे काम चालू असून ते पूर्ण होण्याकडे आहे. पण सध्या ४०० मीटरचे रस्त्याचे काम हे एक वर्षापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, नसता शासनाने ताबडतोब कार्यवाही करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

===Photopath===

170621\img-20210617-wa0122.jpg

===Caption===

नदीपाञातून वाहतूक करण्याची पाळी

Web Title: Transportation has to be done through river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.