शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:36 IST

'त्या आकाच्या नावावर शेकडो एकर जमीन. गायरान जमिनीवर कब्जा मारायचा, हाच परळी पॅटर्न.'

बीड- बीडच्या मस्साजोगमधील सरपंच, संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून, सातत्याने धनंडय मुंडेंवर निशाणा साधत आहेत. अशातच, आता धस यांनी एका मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. बीडच्या टेंभूर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी आज केला.

महादेव अॅपच्या माद्यमातून कोट्यवधीचा घोटाळाबीडमध्ये पोलीस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंससह वाल्किम कराडवर नाव न घेता टीका केली. 'एकाच व्यक्तीच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात, याची संबंधित यंत्रणांनी तपासणी केली पाहिजे. मी पोलीस अधिक्षकांना सांगितले की, या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. महादेव अॅपच्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे. याची लिंक थेट मलेशियापर्यंत आहे. बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला, ' असा दावा धस यांनी केला. 

बीडमधील सर्व घटनांच्या मागे 'आका'सुरेश धस यांनी यावेळी नाव न घेता वाल्मिक कराडांवर जोरदार टीका केली. 'बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या, कुठल्याही घटना घ्या, त्याच्या मागे एकच आका असतो. बीडपासून काही अंतरावर एका व्यक्तीच्या शेतातून बळजबरीने मुरुम काढून आणला गेला. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. 'गँग्स ऑफ वासेपूर'सारखी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या आकाच्या नावावर जिल्ह्यात किती जमिनी आहेत, ते एकदा तपासा.'

जमीन बळकवण्याचा परळी पॅटर्न

'परळीजवळ शिरसाळा गावात गायरान जमिनीवर कब्जा करुन गाळे बांधले गेले आहेत. शिरसाळ्यात 600 विटभट्ट्या चालतात, त्यातील 300 अवैध आहेत. गायरान जमिनीवर बंजारा आणि पारधी समाजातील लोकांची घरे होती. पोलीस लावून त्यांना हाकलून लावलं आणि गायरान जमिनीवर कब्जा केला. कुठे 100 एकर, कुठे 150 एकर...अशा कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आकाच्या नावावर आहेत. हा पैसा कुठूण आणला? गायरान जमिनीवर कब्जा मारायचा, हाच परळी पॅटर्न आहे. परळीमध्ये तर राखेचे माफिया मोठ्या प्रमाणात आहेत. याद्वारे कोट्यवधीची उलाढाल होते, असा आरोपही सुरेश धस यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारी