प्रशिक्षित कार्यकर्ता संस्थेचा आधार बनावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:14+5:302021-06-03T04:24:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील प्रत्येक कर्मचारी एक उत्तम कार्यकर्ता आहे. संघाच्या मुशीतून घडलेला प्रशिक्षित ...

प्रशिक्षित कार्यकर्ता संस्थेचा आधार बनावा
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील प्रत्येक कर्मचारी एक उत्तम कार्यकर्ता आहे. संघाच्या मुशीतून घडलेला प्रशिक्षित कार्यकर्ता भविष्यात संस्थेचा आधार बनला पाहिजे, असे मत संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विभागप्रमुख विलास गायकवाड यांच्या सेवा गौरव कार्यक्रमात शेटे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे पालक विवेक अयाचित, शालेय समितीच्या अध्यक्षा शरयु हेबाळकर, विलास गायकवाड, सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, बिपीन क्षीरसागर, मुख्याध्यापक निवृत्ती दराडे उपस्थित होते.
व्यक्ती नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असते. परंतु तो परिवारातून निवृत होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्याचे परिवाराशी असणारे नाते तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परिवारातील प्रत्येक व्यक्ती संस्था म्हणून जगली पाहिजे. गायकवाड यांच्या रुपाने सकारात्मक विचारसरणीचा एक चांगला कार्यकर्ता संस्थेला लाभला. शांत, संयमी, उत्साही उर्मी असणारे कार्यकर्ते ते होते, असे भावोद्गार शेटे यांनी काढले.
यावेळी विलास गायकवाड म्हणाले, संस्थेत सेवेत असतांना माझ्यावर येथील आचार, विचारांचा परिणाम घडला. ज्या मधूनच माझी जडणघडण झाली. ३४ वर्षांची सेवा घडली. सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले. मला शाळेने व संस्थेने खूप काही दिले. याप्रसंगी त्यांनी शाळेस अकरा हजार रुपयांची देणगी दिली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक निवृत्ती दराडे यांनी केले. संचालन कल्पना जवळगावकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अश्विनी सूर्यवंशी यांनी करुन दिला. आभार शैलेश कंगळे यांनी मानले.
..
===Photopath===
020621\avinash mudegaonkar_img-20210602-wa0066_14.jpg
===Caption===
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळेस अकरा हजारांच्या देणगीचा धनादेश देताना विलास गायकवाड.