फेरीवाल्यांमुळे वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:15+5:302020-12-29T04:32:15+5:30
घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेल्समध्ये वापर अंबाजोगाई : घरगुती गॅस सिलिंडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता ...

फेरीवाल्यांमुळे वाहतूक विस्कळीत
घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेल्समध्ये वापर
अंबाजोगाई : घरगुती गॅस सिलिंडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता येत नाही. मात्र, अंबाजोगाई तालुक्यात नियम डावलून शहर व परिसरात अनेक ठिकाणी चहा व नाष्ट्याची हॉटेल्स चालविणाऱ्यांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सर्रास केला जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा वापर वाढतच चालला आहे.
रोहयोच्या कामांना निधीचा अडथळा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात शेतीतील खरीप हंगाम आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतमजुरांना शेतात कामे राहिले नाहीत. अंबाजोगाई तालुक्यात अनेक शेत-रस्ते मोठ्या पावसामुळे वाहून गेले आहेत. त्या रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जावीत. अशी मागणी पुढे आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर कामे झाल्यास रोजगार उपलब्ध होईल. या कामांना निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी होत आहे.
जनावरांना बसतोय थंडीचा फटका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. रात्रीच्या तापमानात दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी जनावरांना बंद शेडमध्ये ठेवावे. वासरांची योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे यांनी दिला आहे.