धारूर घाटात पुन्हा वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:26 IST2019-01-26T00:25:53+5:302019-01-26T00:26:03+5:30
धारूर घाटात शुक्र वारी सकाळी एक ट्रक नादूरूस्त झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली

धारूर घाटात पुन्हा वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : धारूर घाटात राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्ता पूर्वीएवढाच अरुंद ठेवून थातूरमातूर काम आटोपल्याने घाटात वाहतूक ठप्प होणे हे नियमित झाले आहे. शुक्र वारी सकाळी एक ट्रक नादूरूस्त झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांची रांग पाच कि.मी.पर्यंत पोहचली होती. यामुळे वाहनधारक मात्र वैतागले होते.
खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना धारूर येथील घाटात धुनकवड पाटी ते आंबेडकर चौक धारूर हा रस्ता तसाच ठेवला आहे. घाटात रुंदीकरण करण्यात आले नाही.
हा १२ कि.मी.चा रस्त्याचे सिमेंटकरण न करता डांबरीकरण करून कसाबसा पूर्ण केला आहे. यामुळे धारूर घाटात, अपघाताचे प्रमाण वाढले आहे परिणामी या घाटात नेहमीच वाहतूक ठप्प होत असते.
शुक्रवारी सकाळी एक ट्रक नादुरुस्त झाल्याने जवळपास अडीच ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.