रहदारीचा शेतरस्ता मुरुमाचा बांध घालून अडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:15+5:302021-06-17T04:23:15+5:30
पिंपळनेर : बीड तालुक्यातील जुजगव्हाण येथील जमीन गट नंबर ४२ मधील शेतरस्ता मुरुमाचा बांध घालून अडविण्यात आला आहे. ...

रहदारीचा शेतरस्ता मुरुमाचा बांध घालून अडवला
पिंपळनेर : बीड तालुक्यातील जुजगव्हाण येथील जमीन गट नंबर ४२ मधील शेतरस्ता मुरुमाचा बांध घालून अडविण्यात आला आहे. हा रस्ता अडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे शेतकऱ्याने तक्रार केली आहे.
मंगल भरत सुरवसे यांची जुजगव्हाण येथे शेती असून गट नंबर ४२ मध्ये एक हेक्टर ३२ आर जमीन आहे. सदर जमीन वहिती करण्यासाठी जाण्या-येण्याचा रस्ता हा गावठाण जमिनीच्या बाजूने जातो. हा रस्ता दीपक विक्रम सुरवसे व पप्पू विक्रम सुरवसे यांनी ग्रामसेवक व सरपंचांशी संगनमत करून जागा नावे करून घेतली व शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. १० जून रोजी यांनी मंगल सुरवसे व भरत सुरवसे हे शेतामध्ये रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन जाताना दीपक विक्रम सुरवसे यांनी ट्रॅक्टरवर दगडफेक केली. यावेळी भरत सुरवसे यांच्या पाठीत दगड लागल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर थांबवला. त्याचवेळी दीपक सुरवसे आणि पप्पू सुरवसे यांनी ट्रॅक्टर पेटवून धमकी देत भरत ज्ञानोबा सुरवसे यांना काठीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पिंपळनेर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे आरोपी आम्हाला छळ करून त्रास देत आहेत आरोपींकडून आपल्या कुटुंबाला धोका असून संरक्षण देण्याची मागणी मंगल भरत सुरवसे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.