शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच, यांना कोण आवरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:47 IST

जिल्हा प्रशासनाच्या सावधानता अन् सुरक्षिततेच्या आवाहनाकडे हुल्लडबाजांचे साफ दुर्लक्ष

बीड : तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून, अचानक पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे धरण परिसरात जाणे टाळावे, धरणाच्या काठावर उभे राहून फोटो किंवा सेल्फी घेणे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने टाळावे तसेच पालकांनी मुलांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. मात्र याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

यापूर्वी २ युवकांचा दुर्दैवी मृत्यू१९ ऑक्टोबर २०२१ रोजी बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात बुडून ओंकार लक्ष्मण काळे (वय १६) आणि शिव संतोष पिंगळे (वय १६) यांचा मृत्यू झाला होता. दररोजच्या पावसाने पाणी पातळीत वाढ होत असून, धोक्यात जीव घालून लोखंडी पुलावरून धरणाच्या भिंतीवर व पायथ्याशी पर्यटक सांडव्याच्या ठिकाणी जमा होत आहे. सांडव्याच्या भिंतीवर चढून फोटो काढतात. पाय घसरून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीबिंदुसरा धरणाच्या सांडव्याशेजारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कडेला सावधान, प्रतिबंधक क्षेत्र असा फलक लावण्यात आला आहे. अपघात, दुर्घटना अथवा जिवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार नाही, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून असा फलक लावण्यात आला आहे. या तलावाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संरक्षण व्यवस्था नसल्यामुळेच त्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकतात मात्र प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक नेमकं काय काम करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत. भविष्यात दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

टॅग्स :DamधरणBeedबीडRainपाऊस