शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मूकबधिर तरुणीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:15 IST

मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी मंगळवारी दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देशिरूर तालुक्यातील प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकालशिरूर तालुक्यातील प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड : मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी मंगळवारी दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. शिरुर तालुक्यात २०१६ मध्ये हे प्रकरण घडले होते. पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली होती.शिरुर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणी जन्मापासून मूकबधिर आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबियांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. पीडित तरुणीकडे कुटुंबियांनी चौकशी केल्यानंतर तिने हातवारे करुन संपूर्ण हकीकत सांगितली. फेट्यावाल्याच्या मुलाने आपल्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे तिने खाणाखुणा करुन सांगितले. त्यामुळे कुटुंबियांना आरोपीची खात्री पटली. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरुन १६ नोव्हेंबर २०१६ रोजी गावातीलच हनुमंत विठोबा बांगर (२६) याच्याविरुध्द गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. तो विवाहित असून त्यास एक मुलगा आहे.शिरुर ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक तानाजी दराडे यांनी या प्रकरणाचा तपास करुन हनुमंत बांगरला बेड्या ठोकल्या. तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्या. बी.व्ही. वाघ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी काम पाहिले.पीडितेची सोनोग्राफी करणारे डॉक्टर, ती मूकबधिर असल्याचा निर्वाळा देणारे डॉक्टर, तपास अधिकारी, तिचे नातेवाईक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी न्यायवैद्यक चाचणी अहवाल तसेच दुभाषकामार्फत पीडितेची साक्ष नोंदवून केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्या. वाघ यांनी आरोपी हनुमंत विठोबा बांगर यास कलम ३७६ अन्वये १० वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच बलात्कार करताना पीडितेचा गळा आवळून मारहाण केल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली. अ‍ॅड. अनिल तिडके यांना पैरवी अधिकारी फौजदार राजकुमार मोरे यांचे सहाय्य लाभले.पीडितेचा भाऊच फितूरया प्रकरणात सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी १५ साक्षीदार तपासले. पीडितेचा भाऊ फिर्यादी होता. तो फितूर झाला. मात्र, साक्षी, पुरावे तसेच पीडितेचा दुभाषकामार्फत नोंदविलेला जवाब यामुळे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविता आले.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी