जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST2021-05-29T04:25:55+5:302021-05-29T04:25:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : शौचास गेलेल्या एका ३२ वर्षीय महिलेला एकटे गाठून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर ...

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शौचास गेलेल्या एका ३२ वर्षीय महिलेला एकटे गाठून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गेवराई तालुक्यातील एका गावात घडली. ही घटना १३ मे रोजी घडली असून, २७ मे रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर महिला १३ मे रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शौचास गेली होती. यावेळी आरोपी संतराम नवनाथ जवरे (वय ३५) याने महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तिला गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नेऊन रात्री तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास तिला गावात आणून सोडले. दरम्यान, पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्या पतीला जिवे मारून टाकील, अशी धमकी दिली. याप्रकरणी गुरुवारी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास फौजदार संदीप काळे करीत आहेत.