लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:37 IST2021-02-20T05:37:23+5:302021-02-20T05:37:23+5:30

केज तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथे पळवून नेले. पुण्यातील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार ...

Torture of a minor girl by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केज तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथे पळवून नेले. पुण्यातील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी आणि संशयित विठ्ठल रतन गायकवाड (वय २०, ता. केज ) केज पोलीस ठाण्यात हजर झाले. याविषयी मुलीच्या आईने ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केज पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांत हजर झाल्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार आरोपी विठ्ठल गायकवाड याने तिला लग्नाचे आमिष दाखवून गावातून पुणे येथे पळवून नेले. पुणे येथील लॉजवर नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. तिच्या जबाबावरून आरोपी विठ्ठल गायकवाड याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गुरुवारी आरोपीला अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Torture of a minor girl by showing the lure of marriage