प्रेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:33 IST2021-03-16T04:33:28+5:302021-03-16T04:33:28+5:30

आष्टी तालुक्यातील एका गावात गेल्या आठ महिन्यांपासून तेथीलच अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून रोज त्रास देणे, फोटो असल्याचे सांगून ...

Torture of a minor girl by showing love | प्रेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आष्टी तालुक्यातील एका गावात गेल्या आठ महिन्यांपासून तेथीलच अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून रोज त्रास देणे, फोटो असल्याचे सांगून ब्लॅकमेलिंग करत, अत्याचार व विनयभंग केल्याची घटना घडली. रविवारी मुलीच्या आई-वडिलांच्या लक्षात हा प्रकार आला. अंभोरा पोलीस ठाणे गाठत रविवारी रात्री नऊ वाजता मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अत्याचार, पॉक्सो, विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.

तीन दिवसांची पोलीस कोठडी

गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासात अंभोरा पोलीस ठाण्यातील पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या. सोमवारी आष्टी न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.

Web Title: Torture of a minor girl by showing love