अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:19+5:302021-01-13T05:28:19+5:30
माजलगाव : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातील आरोपीविरोधात ग्रामीण ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार
माजलगाव : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातील आरोपीविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अल्पवयीन मुलीस विशाल संभाजी वैराळे याने लग्नाचे आमिष दाखवून ८ जानेवारी रोजी पळवून नेले होते. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी ९ जानेवारी रोजी आरोपी विरोधात ग्रामीण पोलिसात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीअंती मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल संभाजी वैराळे याचेवर अपहरणासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके हे करत आहेत.