बंजारा समाजाचा उद्या दणका मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:29 IST2019-02-17T00:28:36+5:302019-02-17T00:29:10+5:30

वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील स्वाती राठोडवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरु द्ध न्याय मिळवून देण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दणका मोर्चाचे आयोजन केले आहे.

Tomorrow Front of Banjara Community | बंजारा समाजाचा उद्या दणका मोर्चा

बंजारा समाजाचा उद्या दणका मोर्चा

ठळक मुद्देस्वाती राठोड प्रकरण : बीड जिल्हा बंजारा कृती समितीचे आयोजन

बीड : वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील स्वाती राठोडवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरु द्ध न्याय मिळवून देण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दणका मोर्चाचे आयोजन केले आहे. आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यासाठी ‘आवो गोर, दणका मोर्चा सारू लगावो जोर’ असे आवाहन बंजारा कृती समितीने केले आहे.
तेलगांव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेताना अमर तिडके, हनुमंत सावंत, धनंजय देशमुख आणि विजय लगड यांच्याकडून सततची होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली. स्वाती राठोडला न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चा, आंदोलन, निदर्शने करण्यात आली.
मात्र तरीही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने बीड जिल्हा बंजारा कृती समितीच्या वतीने उपोषण केले. मात्र प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे १८ फेब्रुवारी रोजी दणका मार्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी सोमवारी निघणाºया या विराट दणका मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने बंजारा बांधवानी व सर्व समाज बांधवांनी उपस्थितीती दर्शवावी असे आवाहन बीड जिल्हा बंजारा कृती समितीने केले आहे.

Web Title: Tomorrow Front of Banjara Community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.