गरिबीला कंटाळून वृद्ध इसमाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:53 IST2019-06-06T23:52:06+5:302019-06-06T23:53:02+5:30
गरिबीला कंटाळून आहेर वडगाव येथील जयसिंग विठ्ठलराव रोहिटे (वय ७०)या वृद्ध शेतमजूराने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गरिबीला कंटाळून वृद्ध इसमाने घेतला गळफास
बीड : गरिबीला कंटाळून आहेर वडगाव येथील जयसिंग विठ्ठलराव रोहिटे (वय ७०)या वृद्ध शेतमजूराने गळफास घेऊन आत्महत्या केली. जमीन नसल्याने ते मिळेल ते मजूरीचे काम करुन उदरनिर्वाह करत होते. मात्र, दुष्काळी स्थितीत हाताला काम न राहिल्याने ते तणावात होते. त्यांच्याकडे काही जणांचे हातउसने पैसेही होते. यातूनच त्यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सहा वाजता कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार जयसिंह वाघ, कैलास ठोंबरे यांनी पंचनामा केला. मुलगा शंकर रोहिटे यांच्या माहितीवरुन बीड ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली.