टायमर स्वीच खराब, पथदिवे दिवसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:58+5:302021-03-07T04:30:58+5:30

चपाडळसिंगी : गावातील अनेक भागात काही दिवसांपासून पथदिवे दिवसाही सुरूच राहत असल्याचे दिसून येत आहेत. खांबांवरील टायमर स्वीच खराब ...

Timer switch bad, streetlights continue throughout the day | टायमर स्वीच खराब, पथदिवे दिवसा सुरूच

टायमर स्वीच खराब, पथदिवे दिवसा सुरूच

चपाडळसिंगी : गावातील अनेक भागात काही दिवसांपासून पथदिवे दिवसाही सुरूच राहत असल्याचे दिसून येत आहेत. खांबांवरील टायमर स्वीच खराब झाल्याने पथदिवे तसेच सुरू राहत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

जालना रोडवरील खड्डे बुजविण्याची मागणी

बीड : शहरातील बसस्थानकापासून ते जालना रोडवर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. बायपासमुळे वाहने शहराबाहेरून जात असले, तरी जालना रोडमार्गे शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. या रस्त्यावर मध्यभागी खड्डे पडल्याने चालकांना कसरत करावी लागत आहे.

गुटखाबंदी असतानाही सर्रास विक्री सुरूच

वडवणी : राज्य शासनाकडून गुटखा विक्रीवर प्रतिबंध आहे. लॉकडाऊन काळात या प्रतिबंधाची कडक अंमलबजावणी झाली; मात्र आता शहर व परिसरातील गावात सहजरित्या गुटखा उपलब्ध होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे.

तालखेड परिसरातील रस्ते दुरुस्त करावेत

माजलगाव : तालुक्यातील तालखेड रस्ता व ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळे येत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी बाभळीच्या झाडांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते खराब झाल्याने चालकांना कसरत करावी लागत आहे.

Web Title: Timer switch bad, streetlights continue throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.