दुकाने उघडण्यासाठी दिलेली वेळ हास्यास्पद; व्यापारी, ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:45+5:302021-03-27T04:34:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ ही वेळ हास्यास्पद असून, व्यापारी व ...

The time given to open shops is ridiculous; Merchant, very inconvenient in terms of customers | दुकाने उघडण्यासाठी दिलेली वेळ हास्यास्पद; व्यापारी, ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची

दुकाने उघडण्यासाठी दिलेली वेळ हास्यास्पद; व्यापारी, ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ ही वेळ हास्यास्पद असून, व्यापारी व ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने अतिशय गैरसोयीची आहे. इतक्या कमी वेळेत काहीच होणार नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळेचा पुनर्विचार करावा आणि व्यापाऱ्यांना वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

लाॅकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून, त्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्याच्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी व त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊनऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. कोरोनामुळे अगोदरच बाजारपेठ थंड आहे, त्यातच प्रशासनाने अशाप्रकारचे तुघलकी निर्बंध लावू नयेत, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

कडक लाॅकडाऊनमुळे रोजंदारी करणारे आणि ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना या नियमांचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांचाही विचार करुन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

===Photopath===

260321\26bed_1_26032021_14.jpg

===Caption===

पंकजा मुंडे

Web Title: The time given to open shops is ridiculous; Merchant, very inconvenient in terms of customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.