सिमरी पारगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:52 IST2018-03-10T00:49:56+5:302018-03-10T00:52:04+5:30
माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरफोड्या करून ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिमरी पारगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरफोड्या करून ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये
भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.
माजलगाव शहरापासून २० किमी अंतराव सिमरी पारगाव गाव आहे. गुरूवारी रात्री ११ ते पहाटेपर्यंत चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला. अशोक मधुकर कोरडे यांच्या घराचे चॅनल गेट तोडून चोरटे घरात आले. घरातील कपाट तोडून सोन्याचे गंठण व इतर किंमती वस्तू लंपास केल्या. अशीच चोरी विष्णू रामराव कठाळे, आनंत पडूळे, गजानन मारोती कोरडे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केले. या चारही घटनांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर किंमती साहित्य असा ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सकाळी ही माहिती समजल्यावर तात्काळ दिंद्रुड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस आधिकारी भाग्यश्री नवटके, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.