थरारक ! धावत्या मोपेडने अचानक पेट घेतला; तरुण थोडक्यात बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 18:47 IST2022-01-06T18:45:50+5:302022-01-06T18:47:48+5:30
नागरिकांच्या मदतीमुळे तरूणाचे प्राण वाचले, मोपेड जळून खाक झाली आहे

थरारक ! धावत्या मोपेडने अचानक पेट घेतला; तरुण थोडक्यात बचावला
गेवराई ( बीड ) : गेवराईजवळ बायपासवर एका धावत्या मोपेडने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून नागरिकांनी तातडीने मदत केल्याने तरुण थोडक्यात बचावला.
वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पंकज अंगद पवार ( २७ ) आज दुपारी अहमदनगरहून शेवगावमार्गे गेवराईकडे येत आपल्या मोपेडवरून येत होता. शहराजवळच्या बायपासवर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पंकजच्या मोपेडने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच बायपासवरील दत्तराज हाॅटेलचे मालक संदिप मुळे , किरण घाडगे, माजी नगरसेवक गोरक्ष शिंदे, महादेव मामडे, सचिन मुळे, अनिल रामदासी यांनी धाव घेत तरुणास मोपेडवरून खाली उतरवले.तेवढ्यात मोपेडला आगीने कवेत घेतले. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, मोपेड जळून खाक झाली.