जिल्ह्यात तीन तरुणांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:34 IST2021-09-11T04:34:47+5:302021-09-11T04:34:47+5:30
मांगेवाडी(ता. शिरुर) येथे अनिल देवीदास कोळेकर (रा. जांब ३५ ) याने शिरूर -मांगेवाडी रोडवरील लिंबाच्या झाडाला ...

जिल्ह्यात तीन तरुणांची आत्महत्या
मांगेवाडी(ता. शिरुर) येथे अनिल देवीदास कोळेकर (रा. जांब ३५ ) याने शिरूर -मांगेवाडी रोडवरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. १० रोजी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.
शिरूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याची पत्नी अर्चना अनिल कोळेकर हिच्या माहितीवरून शिरूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. तपास जमादार वसंत जायभाये करत आहेत .
दुसऱ्या घटनेत साळेगाव (ता. केज) येथे लहू दशरथ सरवदे ( ३० ) या तरुणाने १० रोजी सकाळी ११ वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने हे पाऊल का उचलले, हे अजून अस्पष्ट आहे.
....
शेतकऱ्याची आत्महत्या
गेवराई तालुक्यातील मारफळा येथील विलास लक्ष्मण माने (३०) या शेतकऱ्याने ९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब निर्दशनास आल्यावर
कुटुंबीयांनी त्यास तात्काळ जातेगाव आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. तलवाडा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तो शेतीसह ऊसतोडीचे कामही करायचा. आत्महत्येमागील कारण समोर आले नाही.
------