बीड जिल्ह्यात तीन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:24 IST2018-02-21T00:24:08+5:302018-02-21T00:24:13+5:30
बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे तरूणाने, बीड तालुक्यातील रूद्रापुर येथे विवाहितेने तर अंबाजोगाई येथे ४५ वर्षीय इसमाने गळफास ...

बीड जिल्ह्यात तीन आत्महत्या
बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे तरूणाने, बीड तालुक्यातील रूद्रापुर येथे विवाहितेने तर अंबाजोगाई येथे ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व घटना मंगळवारी उघडकीस आल्या.
काजल विलास आघाव (वय २०, रा. रूद्रापूर, ता. बीड) यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी उशिरापर्यंत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
अंबाजोगाईतील बलुत्याचा मळा भागातील अंकुश काळे या ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. काळे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अद्याप याची नोंद झालेली नाही.
सिरसाळा येथील देशपांडे गल्लीतील योगेश रामभाऊ चव्हाण या वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. योगेश हा वाहनचालक आहे. तो आई व बहीण, भावासह जुन्या गावात वास्तव्यास असतो.
सोमवारी रात्री घरी आलेला योगेश हा सकाळ झाली तरी दार उघडत नसल्याने त्याच्या लहान भावाने पत्रावरून घरात प्रवेश केला असता योगेश मृत अवस्थेत आढळला. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.