गेवराईच्या बाजारातून तीन मोबाइल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:01+5:302021-07-25T04:28:01+5:30
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंदचे आदेश आहेत. मात्र यातही कोरोना नियमाला बगल देत गेवराई शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून ...

गेवराईच्या बाजारातून तीन मोबाइल लंपास
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंदचे आदेश आहेत. मात्र यातही कोरोना नियमाला बगल देत गेवराई शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नाईक नगर, सावता नगर दत्त मंदिर, मोंढा नाकासह विविध ठिकाणी आठवडी बाजार भरत आहे. याच आठवडी बाजारात मोढा नाका येथे राधेशाम खरसाडे हे बाजार करत असताना त्यांचा अज्ञात चोरट्यांनी वरील खिशातील सॅमसंग कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. तसेच याच ठिकाणी बाजार करत असलेले बाळू प्रभाकर धापसे, राहणार गेवराई यांचा ओपो कंपनीचा १५ हजारांचा मोबाइल व उत्तम नामदेव राठोड, राहणार माजलगाव यांचादेखील मोबाइल अज्ञात चोरट्यांनी खिशातून लंपास केला. या प्रकरणी तीन्ही जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेवराई शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी, घरफोडी, मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.
शहरातील मोढा नाका येथे बुधवार रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी एक जण भाजी खरेदी करत असताना चोरटा मोबाइल चोरताना एका हाॅटेलच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.