शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत तीन घरे, दुकान फोडून लाखोंचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:22 IST

शहरातीलमध्ये वस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

ठळक मुद्देमागील घटनांचाच तपास अपूर्ण : बीड येथून श्वान पथकाला केले पाचारण

गेवराई : शहरातीलमध्ये वस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील शिवसेना कार्यालयाजवळील एक मशिनरी दुकान फोडून दुकानातील पाण्याच्या मोटारी चोरून नेवून लाखो रुपयांचे साहित्य घेवून चोरटे लंपास झाले. पोलिसांना मागील घटनेचाच तपास लागला नाही तोच पुन्हा ही घटना घडली आहे.शहरातील मध्यवस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील रहिवासी व व्यापारी कैलास लोया यांच्या घराच्या मागील बाजुने अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले एक लाख रूपयांचे सोन्याचे दागिने व नगदी तीन लाख रूपये लंपास केले. त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या संदीप टोनपे यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. त्यांच्या ही घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश करून कपाटातील ४ तोळे सोने व नगदी ३० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्याच समोर असलेले लाईनमन अनंता वडघणे यांच्या घरातील एका खोलीत प्रवेश करून कपाट उचकले मात्र यात काहीच सापडले नाही.राष्ट्रीय महामार्गावरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूस असलेल्या अजित राका यांच्या अनमोल मशिनरी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील ५ एच.पी.च्या ८ पाण्याच्या मोटारी, ७ एच.पी.च्या २ मोटार, ३ एच.पी.च्या ३ मोटारी व नळाच्या ३ मोटारी तसेच नगदी १७ हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदरील घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून, सकाळी बीड येथील श्वान पथक मागवण्यात आले होते. याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.नागरिकांत भीतीचे वातावरणशहरातील खक्का मार्केटमध्ये राहणारे प्रवीण शर्मा यांच्या घरावर १ एप्रिल रोजी दरोडा टाकण्यात आला. यात त्यांच्या आई पुष्पाबाई शर्मा यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. याला आठ महिने उलटूनही तपास लागला नाही.दुसरी घटना शहरातीलच रंगार चौक भागात आॅक्टोबर महिन्यात एक वकील, बँक कर्मचारी तसेच एका महिलेच्या घरात चोरट्यांनी जबरी चोरी करून लाखो रूपयांचा माल लंपास केला होता. याचाही तपास लागला नाही. तोच पुन्हा ही तिसरी मोठी घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी