तिसरीची हजेरी लिहिली नाही म्हणून पहिलीच्या शिक्षकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:18+5:302021-06-18T04:24:18+5:30
परळी शहरातील नाथरोड भागात महर्षी कणाद प्राथमिक विद्यालय आहे. या विद्यालयात सतीश बळीराम जाधव हे २००२ पासून सहशिक्षक म्हणून ...

तिसरीची हजेरी लिहिली नाही म्हणून पहिलीच्या शिक्षकाला धमकी
परळी शहरातील नाथरोड भागात महर्षी कणाद प्राथमिक विद्यालय आहे. या विद्यालयात सतीश बळीराम जाधव हे २००२ पासून सहशिक्षक म्हणून कार्यरत असून, पहिलीचा वर्ग सांभाळतात. बुधवारी जाधव यांनी मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी प्रवेश अर्ज भरून घेतले. कार्यालयीन वेळेनंतर सर्व सहकाऱ्याप्रमाणे सतीश जाधव हे घरी निघाले. रस्त्यात असताना त्यांना तिसरीच्या वर्गाची हजेरी का लिहिली नाही, मी संस्थेचा मालक आहे, तू आमचा गुलाम आहे, असे म्हणून महर्षी कणाद विद्यालयाच्या माध्यमिक विभागातील लिपिक केशव भांगे यांनी मोबाइलवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहशिक्षक सतीश बळीराम जाधव यांनी परळी शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. त्यावरून केशव भांगे याच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. केशव भांगे हे संस्थाचालकांचे पुत्र आहेत. तपास परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.