शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:46 IST

जिंकल्यावर मला लोकांनी इज्जत दिली. परंतु पराभव झाल्यानंतर त्यापेक्षाही जास्त इज्जत मिळाली. आताग डबड न करता  आपल्याला डाव खेळायचे आहेत, असेही पंकजा म्हणाल्या.  

बीड : लोकसभा निवडणुकीत गडबड झाली; पण ती पुसून टाकायची आहे. आता राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करणार  असून वंचित, दलित, पीडितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेतला जाईल, असा इशारा भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांनी दिला. दरम्यान, परंपरेनुसार चालत आलेल्या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच धनंजय मुंडे हजर होते.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर शनिवारी परंपरेनुसार दसरा मेळावा घेण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची खदखद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी खा. डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह आजी-माजी आमदारांची उपस्थिती होती.

जिंकल्यावर मला लोकांनी इज्जत दिली. परंतु पराभव झाल्यानंतर त्यापेक्षाही जास्त इज्जत मिळाली. आताग डबड न करता  आपल्याला डाव खेळायचे आहेत, असेही पंकजा म्हणाल्या.  

वेगळा मेळावा घेण्याचा विचार आला नाही-पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या मेळाव्याला पहिल्यांदाच हजेरी लावली. भगवान गडाला, त्यांच्या भक्ताला, स्व. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे आणि माझ्या नशिबी कायमच संघर्ष आला. परंपरेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी या मेळाव्याला आलो. -१२ वर्षे मला या ठिकाणी येण्यासाठी जमले नाही; पण वेगळा दसरा मेळावा घेण्याचा कधी विचारही मनात आला नाही. कारण ज्याला वारसा दिलाय, त्याने तो पूर्ण मंत्री मुंडे म्हणाले. 

ओबीसी आंदोलक हाके, वाघमारे हजरओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही हजेरी लावली. भविष्यात या गडावर संत बाळूमामा, पोहरादेवी, खंडोबा, बिरूबा यांचीही पालखी आल्याशिवाय राहणार नाही, असे हाके म्हणाले.

जातीवर स्वार होणाऱ्याच्या मागे जाऊ नकाअपघात झाल्यावर चालकाची, अत्याचार झाल्यावर मुलगी आणि आरोपीची जात विचारतात. असा समाज घडवण्यासाठी आम्ही आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाहीत. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर बघून काम द्यायचे आहे. जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहायचे आहे. उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कुणाच्याही पाठीमागे उभे राहायचे नाही, असेही पंकजा यांनी म्हटले.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा