शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातील दानपेटीवर तिसऱ्यांदा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:54 IST

आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट येथील मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील पिंपरी येथील घटना

कडा : आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट येथील मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. यापुर्वी देखील दोन वेळा दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी येथील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करत पोलिसांना आव्हान दिले आहे.आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरातील कुलूपबंद असलेली लोखंडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तसेच घटनेचा पंचनामा केला, याप्रकरणी रात्री उशिरार्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. चोरलेली दानपेटी न फुटल्यामुळे ती आहे त्या अवस्थेत गावाशेजारी ज्वारीच्या शेतात टाकून चोरटे पळून गेले. ही दानपेटी ताब्यात घेतली असून, त्यामध्ये किती रक्कम होती हे अद्याप समजू शकले नाही. परंतु, सहा महिन्यापुर्वी येथील मंदिरातील दानपेटी चोरून चोरट्यांनी त्यातील पैसे चोरत ही दानपेटी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगा येथील शेततलावात टाकली होती. वारंवार चोरीच्या घटना घडत असून या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.पिंपरी घाट येथील या मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना तिस-यांदा घडली आहे. पहिल्या दोन प्रकरणातील चोरट्यांचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा तिस-यांदा चोरी करण्याची हिंमत चोरट्यांनी दाखवली आहे.

टॅग्स :BeedबीडTempleमंदिरtheftचोरीPoliceपोलिस