बीडची ‘झाडवाली झुंबी’ राज्यात तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:40 IST2018-02-19T00:40:05+5:302018-02-19T00:40:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यभरातून आलेली तब्बल चारशे बालनाटके...यातून निवडलेल्या मोजक्याच १४ नाटकातून बीडच्या परिवर्तनाच्या ‘झाडवाली झुंबी’ या ...

बीडची ‘झाडवाली झुंबी’ राज्यात तृतीय
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यभरातून आलेली तब्बल चारशे बालनाटके...यातून निवडलेल्या मोजक्याच १४ नाटकातून बीडच्या परिवर्तनाच्या ‘झाडवाली झुंबी’ या बालनाटकाने विविध तीन बक्षिसे पटकावून बीडच्या नाट्यसृष्टीचा झेंडा राज्यात रोवला..!
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे या महसूल विभागात राज्य बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी झाली. त्यात जवळपास चारशे नाटके सहभागी झाली होती, हा एकप्रकारे विक्रमच होता. या सर्व विभागातून सर्वोत्कृष्ट दोन-दोन नाटके निवडून त्याची इचलकरंजी येथे अंतिम फेरी १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान झाली.
यात बीडच्या परिवर्तन प्रतिष्ठानच्या झाडवाली झुंबी या बाल नाटकास सर्वोत्कृष्ट तिसरे बक्षीस मिळाले. तर नाटकाचे लेखक दिग्दर्शक डॉ. सतीश साळुंके यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा तिसरा आणि झुंबीची भूमिका करणाºया श्रद्धा रामराव निर्मळ हिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मिळाले.
प्राथमिक फेरीत हे बालनाट्य औरंगाबाद विभागात पहिले आले होते. या नाटकात कुमारी प्रांजल एरंडे, अंजली कदम सृष्टी शिंदे, साक्षी बायस, राघव राऊत, आर्यन परदेशी, प्रथमेश खडकीकर, यश काळे, सोहम कुळकर्णी, तेजस महाजन यांच्या भूमिका उल्लेखनीय झाल्या.
नाटकास अशोक घोलप यांनी संगीत दिले तर चंद्रकांत काळे यांनी संगीत संकलन केले सुधा साळुंके यांनी वेशभूषा व रंगभूषा केली तर प्रदीप मनोहर यांनी नाटकाचे नेपथ्य केले होते. नाटकास मंगेश रोटे, प्रशांत मुळे व बापू भोसले यांनी सहकार्य केले.