माजलगावात रोहित पवारांच्या सभेत चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST2021-01-18T04:30:49+5:302021-01-18T04:30:49+5:30
बीड : आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत माजलगावात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ‘इमिटेशन ज्वेलरी’चे प्रदर्शन भरविणाऱ्या व्यक्तीच्या ...

माजलगावात रोहित पवारांच्या सभेत चोरट्यांचा धुमाकूळ
बीड : आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत माजलगावात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ‘इमिटेशन ज्वेलरी’चे प्रदर्शन भरविणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची ९६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेली, तर काही जणांचे पाकीटही चोरट्यांनी हातोहात लंपास केले. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रुचीर रमेश दुर्गे (३०, रा. नरखेड जि. नागपूर) यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. माजलगावात शनिवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत दर्पण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. इथे मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, रुचीर दुर्गे यांनी या ठिकाणी इमिटेशन ज्वेलरीचे प्रदर्शन भरविले होते. सजावटही केली होती. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १९ ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची ९६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रुचीर यांनी माजलगाव शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत चाेरट्यांनी अनेकांची पाकिटेही लंपास केली आहेत. या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.