गेवराईत चोरट्यांचा धुमाकूळ, तीन ठिकाणी चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:42+5:302021-07-18T04:24:42+5:30
गेवराई : शहरातील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बॅंक व सहा दुकाने फोडली होती. याला आठ दिवस उलटले नाहीत तोच ...

गेवराईत चोरट्यांचा धुमाकूळ, तीन ठिकाणी चोऱ्या
गेवराई : शहरातील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बॅंक व सहा दुकाने फोडली होती. याला आठ दिवस उलटले नाहीत तोच पुन्हा शहरात व तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शहरापासून जवळच असलेल्या बागपिंपळगाव बायपासजवळ अज्ञात चोरट्यांनी तीन घरांत प्रवेश करून मारहाण करत सोन्याचे दागिने आदी ८६ हजारांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास चोरट्यांनी हा धुमाकूळ घातला.
शहरापासून जवळच असलेल्या बागपिंपळगाव बायपासजवळ राहणारे अशोक नागनाथ उबाळे हे रात्री जेवण करून आपल्या घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने घेऊन जाताना अशोक उबाळे यांनी चोरांना विरोध केला तेव्हा चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. यात उबाळे यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर त्यांचे वडील नागनाथ उबाळे यांनाही मारहाण करत चोरटे सोने घेऊन पसार झाले. नंतर चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या सोमनाथ सोनवणे व भारत बेदरे यांच्या घरात प्रवेश करून तेथील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. एकूण तीन घटनांमध्ये ८६ हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गेवराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या चोरीच्या घटना घडल्या आहेत.
170721\sakharam shinde_img-20210717-wa0043_14.jpg