चोरट्यांचा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:25 IST2021-04-29T04:25:44+5:302021-04-29T04:25:44+5:30
गेवराई : तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायतीच्या सचिवालयातील श्री साईराम अर्बन बँकेत अज्ञात चोरट्यांंनी शटर तोडून बँकेत प्रवेश केला. यावेळी ...

चोरट्यांचा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला
गेवराई : तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायतीच्या सचिवालयातील श्री साईराम अर्बन बँकेत अज्ञात चोरट्यांंनी शटर तोडून बँकेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
चोरट्यांनी बँकेत इतरत्र सीसीटीव्हीसह तोडफोड केली. सीडीआर घेऊन चोरटे पसार झाले. येथील सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते ड्युटीवर नव्हते. बाहेरच्या शटरच्या बाजूने दोन सीसीटीव्ही कॅमेरे बँकेने लावलेले होते. एक कॅमेरा तोडून शटरच्या बाजूने फेकून देण्यात आला. बाजूच्या संगणक केंद्राचा पण दरवाजा तोडून लॅपटॉप चोरून नेला. बँकेच्या कर्मचाऱ्यांना सकाळी बँकेत आल्यानंतर हा प्रकार कळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांना दिली. ते घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. नवघरे यांनी बीडहून फिंगर प्रिंट पथक बोलावून तपासणी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.