धुनकवाड येथील वयोवृद्ध शेतकऱ्यावर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:30+5:302021-02-25T04:41:30+5:30
धारूर : धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील वयोवृद्ध शेतकऱ्यांवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला करून, दोन शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आल्या ...

धुनकवाड येथील वयोवृद्ध शेतकऱ्यावर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला
धारूर : धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील वयोवृद्ध शेतकऱ्यांवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला करून, दोन शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आल्या असून, जखमी शेतकऱ्यांला धारूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुनकवाड येथील वयोवृद्ध शेतकरी भीमा जावळे (वय ७०) हे आपल्या शेतात राहतात. रात्री त्यांच्या शेतातून चोरट्यांनी दोन शेळ्या चोरून घेऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी करून रक्तबंबाळ केले आहे. डोक्यात व नाकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. भीमा जावळे हे एक गरीब कुटुंबातील असून, डोंगराच्या पायथ्याशी त्यांची जमीन आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या दोन शेळ्या ही चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या हल्ल्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले आहे. या आधीही धुनकवाड येथे अशा छोट्या-मोठ्या चोऱ्या अनेक वेळा झाल्या आहेत. अशा भुरट्या चोरांचा पोलिसांनी तपास करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.