शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बायकोचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चोरल्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 11:58 IST

पोलिसांनी तीन चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देटोळीचा पुण्यासह मराठवाड्यात धुमाकूळ 

- सोमनाथ खताळ

बीड : खाजगी नोकरीच्या पैशावर बायकोची ‘हौस’ पूर्ण होत नाही. मग तिला श्रीमंत आहोत, असे दाखविण्यासाठी आणि  ‘इम्प्रेशन’ पाडण्यासाठी तरूणांनी चुकीचा मार्ग अवलंबला. पुण्यासह मराठवाड्यातील दुचाकी चोरून आलेल्या पैशांमध्ये ‘व्हीआयपी’ कार घ्यायची आणि त्याच कारमधून बायकोला ‘सफर’ घडवून आणण्याचा प्लॅन बीड पोलिसांनी उधळून लावला आहे. तीन चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई एलसीबी आणि पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.

सुशांत मुंडे (२१ रा.साळींबा, ता.वडवणी), गणेश मुंडे (२२ रा.धारूर) व सुनील (अल्पवयीन असल्याने नाव बदलले) अशी आरोपींची नावे आहेत. सुशांत हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील दुचाकी चोरीची गुन्हे दाखल आहेत. तोच या टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. आठवड्यापूर्वीच सुशांत आणि सुनिल यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त केल्या होत्या. गुरूवारी त्यांचा तिसरा साथीदार गणेश मुंडे याला केजजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी १५ दुचाकी जप्त केल्या. आतापर्यंत एकूण ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सुशांतने पुण्यातच केला प्रेमविवाहसुशांत आणि गणेश हे जिवलग मित्र. ते पुण्यातील एका कंपनीत काम करीत होते. येथेच त्यांची एका मुलीसोबत ओळख झाली. त्यांनी आळंदीत जाऊन विवाह केला. त्यानंतर ते सर्व सोबत रहात होते. 

बायकोचे स्वप्न अधुरेचसर्व दुचाकी विक्री करून आलेल्या पैशातून सुशांत बायकोसाठी एक व्हीआयपी कार घेणार होता. याच कारमधून तिला कंपनीत सोडण्याचे स्वप्न त्याने दाखविले होते. तसेच प्रत्येक विकएण्डला त्यांचे फिरायला जाण्याचे नियोजन होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे हे सर्व स्वप्न हवेत विरले. 

आणखी गुन्हे उघड होतील तीन दुचाकी चोरांकडून ३५ दुचाकी जप्त केल्या असून २४ गुन्हे उघड झाले आहेत. काही दुचाकींची ओळख पटविणे सुरू आहे. अजून गुन्हे उघड होऊ शकतात. तसेच या टोळीसोबत कनेक्ट असलेल्यांचा इतर गुन्हेगारांचाही शोध घेणे सुरू असून ते लवकरच सापडतील एलसीबीने चांगली कामगिरी केली.- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीBeed policeबीड पोलीसArrestअटक