नुकसानीचे पंचनामे होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:30+5:302021-03-07T04:30:30+5:30
अस्ताव्यस्त पार्किंगने पादचारी त्रस्त अंबेजोगाई : शहरात भगवानबाबा चौक ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या मुख्य रस्त्यावर चार चाकी ...

नुकसानीचे पंचनामे होईनात
अस्ताव्यस्त पार्किंगने पादचारी त्रस्त
अंबेजोगाई : शहरात भगवानबाबा चौक ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या मुख्य रस्त्यावर चार चाकी व दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावरून सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शिवाजी चौक ते बसस्थानक परिसरापर्यंत एका बाजूने फूटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या फूटपाथवर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटल्याने वृद्ध व नागरिकांना रस्त्याने चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मोबाइलच्या चोऱ्या वाढल्या
बीड : शहरातील बाजार परिसरात व गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाइल, रोख रक्कम लांबवित असल्याने नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. या भुरट्या चोरांचा व मोबाइल पळविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे, परंतु अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.
विटा निर्मितीची कामे वेगात
अंबेजोगाई : शहर व परिसरात वीट निर्मितीच्या कामाला मोठा वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात वीटभट्ट्या बंद असल्याने त्यांना चांगलाच फटका बसला होता. आता पुन्हा बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने विटांची मागणी वाढली आहे. शहरी भागात विटा निर्मितीच्या कामांना मोठा वेग आला आहे. त्यामुळे विटा निर्मितीवर काम करणाऱ्या मजुरांना दिलासा मिळाला आहे.
कचरा जागेवर; नागरिक त्रस्त
बीड : शहरातील अनेक भागात कचराकुंडीतील रस्ता ओसंडून जात असून, कचरा कुंडीबाहेर येऊन दुर्गंधी वाढत आहे. कचरा उचलला जात नसल्याने कुत्रे, जनावरे या ठिकाणी फिरत आहेत.