आधीच्या शाळेची बेबाकी असल्याशिवाय नवीन प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:35 IST2021-02-20T05:35:49+5:302021-02-20T05:35:49+5:30
गेवराई : नर्सरीपासून ते नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देताना टी.सी. मागणी अर्जासोबत किंवा स्वतंत्रपणे नो ड्युज अर्ज देणे बंधनकारक ...

आधीच्या शाळेची बेबाकी असल्याशिवाय नवीन प्रवेश नाही
गेवराई : नर्सरीपासून ते नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देताना टी.सी. मागणी अर्जासोबत किंवा स्वतंत्रपणे नो ड्युज अर्ज देणे बंधनकारक राहील. पूर्वीच्या शाळेचे फी भरल्याचे बेबाकी प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन प्रवेश शाळेने देऊ नये, असा निर्णय इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (इसा) बैठकीत घेण्यात आला.
येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनची बैठक मराठवाडा अध्यक्ष भारती बांगर व बीड जिल्हा सचिव श्रीमंत सानप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोना काळात लाॅककडाऊनमुळे शाळांमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोना काळातही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. मागील अकरा महिन्यांत शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र शासनाकडून २५ टक्के आरटीई परतावा मिळालेला नाही. त्यामुळे बैठकीत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी नर्सरीपासून ते नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देताना टी.सी. मागणी अर्ज सोबत किंवा स्वतंत्रपणे नो ड्युज अर्ज देणे बंधनकारक राहील. प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या कार्यालयात ईसा नियमावली लावणे, मात्र पूर्वीच्या शाळेची फी भरल्याचे बेबाकी प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन प्रवेश शाळेने देऊ नये, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस तालुका अध्यक्ष गणेश क्षीरसागर, तालुका सचिव प्रा. मोहन ठाकर, उपाध्यक्ष गोपाल शर्मा, सुमित बोरडे, विकास कोकाटे, दराडे, वर्षा क्षीरसागर, चाळक. विजय राठोड, संदीप वारे, गायकवाड, विनोद खरात, तांबे, गणेश चाळक आदींची यावेळी उपस्थिती होती.