सावकारी कर्जाबाबत जनजागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:37+5:302021-07-03T04:21:37+5:30

------------------------- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तिढा सुटेना अंबाजोगाई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना यंदाही ...

There is a need for public awareness about lending | सावकारी कर्जाबाबत जनजागृती हवी

सावकारी कर्जाबाबत जनजागृती हवी

-------------------------

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तिढा सुटेना

अंबाजोगाई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना यंदाही पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीचा तिढा सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.

------------------------------

रेती तस्करीने महसूलात घट

अंबाजोगाई : प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव झाले नसतानही रेती चोरट्यांकडून रेतीची तस्करी सुरु असल्याने शासनाच्या महसूलात घट होत आहे. रेतीचे घाट लिलाव नसताना अनेक नदी पात्रातून वाळूचा प्रचंड उपसा होत आहे. यामुळे रेती माफिया गब्बर होत असले तरी शासनाचा महसूल बुडवला जात आहे.

---------------------------

कार्यालयातून तक्रार पेट्या गायब

अंबाजोगाई : शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी वरिष्ठांकडे जाणार या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रार पेट्या लटकविलेल्या दिसायचे आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.

------------------------

अनेक गावातील हातपंप नादुरुस्त

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप तयार करण्यात आले. मात्र या हातपंपाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. निधीअभावी अनेक गावात दुरुस्ती रखडली आहे. हे हातपंप दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते धनराज पवार यांनी केली आहे.

Web Title: There is a need for public awareness about lending