वाहतूक नियमांचे होतेय उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:22+5:302021-02-05T08:26:22+5:30
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त अंबाजोगाई : शहरातील योगेश्वरीनगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ...

वाहतूक नियमांचे होतेय उल्लंघन
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : शहरातील योगेश्वरीनगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या रस्त्यावर अनेक वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांना या रस्त्याने जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठ-मोठ्या खड्ड्यांत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडतात. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने घडत आहेत, अशी स्थिती असूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्यालगत काटेरी झुडपे वाढली
अंबाजोगाई : तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. यावर्षी मोठा पाऊस झाल्याने गवत व झुडपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. काटेरी झुडपे तोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.
रौळसगाव-बोरखड रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील रौळसगाव व बोरखेड रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार खड्डा चुकविताना अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे.