चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:11+5:302021-02-05T08:26:11+5:30
पोलिसांसमोरच अवैध वाहतूक बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या ...

चोऱ्यांचे प्रमाण वाढले
पोलिसांसमोरच अवैध वाहतूक
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रशांतनगर परिसरात वाहतूक कोंडी
अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका या प्रशांतनगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर खाजगी रुग्णालये व व्यापारपेठ असल्याने वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच पार्क केली जातात, तसेच या परिसरात सातत्याने कोणाचे ना कोणाचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडलेले असते. या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून वाहतुकीची कोंडी दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.