चोऱ्या दुपटीने वाढल्या; खुनाचे गुन्हे बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:56+5:302021-08-18T04:39:56+5:30

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू केले होते. दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात निर्बंध ...

Thefts doubled; Accused of murder | चोऱ्या दुपटीने वाढल्या; खुनाचे गुन्हे बरोबरीत

चोऱ्या दुपटीने वाढल्या; खुनाचे गुन्हे बरोबरीत

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू केले होते. दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख विक्रमी प्रमाणात उंचावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चोऱ्या दुपटीपेक्षा अधिक वाढल्या आहेत, तर महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये भर पडल्याचे चित्र आहे. खुनासारखे गंभीर गुन्हेही बरोबरीत आहेत.

कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले. रोजीरोटीसाठी मोठ्या शहरात स्थिरावलेल्या अनेकांना कुटुंबकबिल्यासह गाव जवळ करावे लागले. गावात हाताला काम नाही, जगण्याचा बिकट प्रश्न, त्यातून आलेले नैराश्य, व्यसनाधीनता. या सगळ्याचा परिणाम जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरला. दुचाकीचोरी, मोबाइल चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यात झालेली वाढ चक्रावून सोडणारी आहे. खून व खुनी हल्ले हे गुन्हे बरोबरीत आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यातही वाढ झालेली दिसून येत आहे. गतवर्षी कडक लॉकडाऊन होते. यंदा काहीसे निर्बंध शिथिल होते. मात्र, असे असले तरी लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीत झालेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे पोलिसांचे काम वाढले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

आकडेवारी काय सांगते.

गुन्ह्याचा प्रकार जुलै २०२० जुलै २०२१

खून ३२ ३१

खुनाचा प्रयत्न ९० ९५

बलात्कार ६५ ८२

चोरी ७४१ ३३७

दरोडा १३ १२

.....

कोरोना महामारीनंतर गुन्हेगारीत वाढ झालेली दिसत आहे. या अनुषंगाने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. गस्त वाढविण्यासह लोकांमध्ये जनजागृती करणे व गुन्हेप्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

-आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

....

लॉकडाऊनमध्ये लोक व्यसन करत नव्हते असे नाही; पण आता निर्बंध सुटल्यानंतर विकृती वाढली आहे. काही जणांचे व्यसनही सुटली. मात्र, काही जण नैराश्येत गेले. त्यामुळे मनावर ताबा असणे गरजेचे आहे. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे.

- रेखा ढेरे, मानसशास्त्र प्राध्यापिका

....

Web Title: Thefts doubled; Accused of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.