केजमध्ये भरदिवसा सव्वादोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:13+5:302021-02-05T08:23:13+5:30

येथील केज-कळंब रोडलगतच्या जुन्या सिंचन कार्यालयाच्या कंपाऊंडच्या भिंतीशेजारी अरुण धारूरकर यांचे दोन मजली घर आहे. २६ जानेवारी रोजी ...

Theft of Rs 12 lakh all day in the cage | केजमध्ये भरदिवसा सव्वादोन लाखांची चोरी

केजमध्ये भरदिवसा सव्वादोन लाखांची चोरी

येथील केज-कळंब रोडलगतच्या जुन्या सिंचन कार्यालयाच्या कंपाऊंडच्या भिंतीशेजारी अरुण धारूरकर यांचे दोन मजली घर आहे. २६ जानेवारी रोजी घराचा समोरील दरवाजा बंद करून कुलूप लावून त्यांच्या खानावळीत गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील साड्यांखाली ठेवलेल्या चावीने लॉकरचे कुलूप उघडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. यात २२ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, ३० ग्रॅम वजनाचे पट्टी गंठण, ५ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, ८ ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर, ३ ग्रॅम वजनाची गळ्यातील ठुशी व नगदी १० हजार रुपये असा एकूण २ लाख २७ हजार ४५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. सविता अरुण धारूरकर यांच्या फिर्यादीनुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे तपास करीत आहेत.

Web Title: Theft of Rs 12 lakh all day in the cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.