शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मिरकाळा येथे बैलजोडीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:32 IST

गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ऐन मशागतीच्या दरम्यानच ...

गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ऐन मशागतीच्या दरम्यानच बैलजोडी चोरीला गेल्याने संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी बुधवारी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील शेतकरी पोपट रंगनाथ मुंढे यांचा बैलाचा गोठा गावकुसाजवळ आहे. दरम्यान पोपट मुंढे हे सोमवारी सायंकाळी बैलांना चारावैरण करुन घरी गेले असता सोमवारी रात्रीच्या सुमारास या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांची बैलजोडी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

दरम्यान दोन दिवस माजलगाव, पाथर्डीसह आसपास शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी आढळून आली नाही. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून ऐन कामाच्या दरम्यान दोन्ही बैल चोरीला गेल्याने शेतकरी पोपट मुंढे हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सदरील बैलाची किंमत ९० हजारांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास बिट अमलदार सतिश खरात करत आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मोबाईल, बैलजोडी, शेतातील इंधन मोटारी सह आदि चोरीला जात असल्याचे दिसून येत आहे.