बँकेसमोरून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:58+5:302021-02-06T05:02:58+5:30

बीड : वाहन चोरीच्या घटनांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. माजलगाव शहरातील एका बँकेसमोर अनिल विठ्ठल झगडे ...

Theft of a bike in front of a bank | बँकेसमोरून दुचाकीची चोरी

बँकेसमोरून दुचाकीची चोरी

बीड : वाहन चोरीच्या घटनांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. माजलगाव शहरातील एका बँकेसमोर अनिल विठ्ठल झगडे यांनी त्याची दुचाकी (क्र.एमएच ४४ आर ०२५९) ही उभी केली होती. ती अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली. जिची किंमत ४० हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी त्यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोना राऊत हे करत आहेत.

दुचाकीची चोरी

बीड : वडवणी पोलीस ठाणे हद्दीत शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे गणेश रावसाहेब मुंडे यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच ४४ एक्स २३४६) ही घरासमोर उभी केली होती. ती चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुंडे यांनी वडवणी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना आघाव हे करत आहेत.

ट्रॅक्टर ट्रॉली चोरी

बीड : कारखान्यावर ऊस सोडून आल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी चालक गेल्यानंतर ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून हेड चोरीस नेल्याची घटना गेवराई तालुक्यातील जय भवानी साखर कारखाना परिसरात घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात रमेश बाबूराव जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सफौ फड हे करत आहेत. मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वाढत असून, वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Theft of a bike in front of a bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.