शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी कॅनडात डॉक्टर, इकडे नशेखोर पती कारचोरीच्या गुन्ह्यात गजाआड

By संजय तिपाले | Updated: January 5, 2023 13:18 IST

अंबाजोगाईतून पळवलेली कार नांदेडमध्ये मिळाली, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड : अमली पदार्थांमुळे तरुण पिढीच्या आयुष्याची कशी धूळधाण होते, यावर वेध घेणारा ‘उडता पंजाब’ चित्रपट अलीकडे गाजला होता. कॅनडात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीचा नशेखोर पती पंजाबमधून नांदेडमार्गे अंबाजोगाईत पोहोचला आणि दरवाजाचे लॉक तोडून कार घेऊन पळाला. नांदेडपोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून चोरीच्या कारसह अंबाजोगाई पोलिसांच्या स्वाधीन केले. अमली पदार्थांच्या व्यसनाचे भयाण वास्तव यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.

लखवीरसिंग गुरमेजसिंग (२६, रा. भैल दानावाला, २३ फतेहबाद, जि. तरतारन, पंजाब) असे त्या आरोपीचे नाव आहे. २९ डिसेंबर रोजी पहाटे श्रीकांत संतराम सुवर्णकार (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) या शिक्षकाची ७५ हजार रुपयांची कार (एमएच २३ ई- ६८४०) लंपास झाली होती. याबाबत १ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, श्रीकांत सुवर्णकार यांनी कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून कार कोठे आढळल्यास संपर्क करावा, असे आवाहन केले होते. ही कार नांदेडमध्ये असल्याची माहिती सुवर्णकार यांना मिळाली. त्यांनी अंबाजोगाई शहर पोलिसांना याची माहिती दिली. पो. नि. बाळासाहेब पवार व हवालदार किसन घोळवे यांनी तातडीने नांदेड पोलिसांशी संपर्क करून कार ताब्यात घेण्याची विनंती केली. तेथील पोलिसांनी कारसह संशयित लखबीरसिंग गुरमेजसिंगला ताब्यात घेतले. त्यानंतर अंबाजोगाई पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी लखबीरसिंगची दोन दिवस पोलिस कोठडी घेऊन चौकशी केली. त्याची गुन्हे पार्श्वभूमी नाही. अंबाजोगाई शहर ठाण्यात नव्या वर्षात नाेंद झालेल्या कारचोरीच्या गुन्ह्यात लखबीरसिंगला पहिल्यांदा अटक झाल्याची माहिती हवालदार किसन घोळवे यांनी दिली.

व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याऐवजी नांदेडला आला पळूनलखबीरसिंगची पत्नी कॅनडात वैद्यकीय शिक्षण घेते. त्याचे आईवडील मोठे जमीनदार आहेत. मात्र, लखबीरसिंगला चरस, गांजा यांसारख्या घातक अमली पदार्थांचे व्यसन जडले. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे तो नांदेडला पळून आला. रेल्वेत बसून तो पूर्णा, परळी येथे पोहोचला व तेथून अंबाजोगाईला आला. दरवाजा तोडून कार चोरी करत त्याने पुन्हा नांंदेड गाठले.

आरोपी नशेखोर आहेआरोपी नशा करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली; पण कारचोरीशिवाय इतर काही गुन्हे केल्याचे समोर आलेले नाही. त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्डही आढळले नाही. ४ जानेवारीला त्यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.- बाळासाहेब पवार, पो. नि. अंबाजोगाई शहर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडBeedबीडPoliceपोलिस