शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेकीला भेटायला आई १०० किमीवरून आली, १०० मीटरवर तिचं घर असताना अपघाती सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:56 IST

माय लेकीची भेट अधुरी! लेकीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू

- नितीन कांबळेकडा - मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आईचा रस्ता ओलांडताना कारचा धक्का लागल्याने पाठीमागून येणार्‍या बसखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. तायराबी शेख ( ७० रा.कुक्कडगांव, उस्मानाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यातील कुक्कडगांव येथील तायराबी शेख या आष्टी तालुक्यातील धानोरा येथे राहत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी बुधवारी आल्या होत्या. धानोरा येथे बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान उतरल्यानंतर त्या मुलीच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. यावेळी अहमदनगरवरून जामखेडकडे जाणार्‍या कारने ( क्रमांक एम.एच १३ एजे१९००) धक्का दिल्याने त्या रस्यावर पडल्या याचवेळी भोकरवरून अहमदनगरकडे जात असलेल्या बसखाली ( क्रमांक एम.एच.२० बीएल ४०१०) चिरडल्या गेल्या. यातच तायराबी शेख यांचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार बाबू तांदळे, भरत माने यांनी भेट देऊन पंचनामा केला. कडा प्राथमिक आरोग्य शवविच्छेदन करण्यात आले. अंभोरा पोलिस ठाण्यात अपघाताला कारणीभूत ठरणारी दोनही वाहने लावण्यात आली आहेत.

माय लेकीची भेट राहिली अधुरी....१०० किलो मीटर अंतरावरून मुलीला भेटण्यासाठी आलेल्या आईला मुलीच्या घरी जाण्यासाठी १०० मीटर अंतर पार करायचे होते. पण एवढ्या अंतरावर येऊन देखील मायलेकीची भेट अधुरी राहिली. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू