शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा ताबा सुटला अन् एकाचा जीव गेला; पत्नीच्या डोळ्यादेखत तरुणाच्या अंगावरून गेला टेम्पो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:29 IST

अपघातातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; पाच दिवसाची झुंज अपयशी

- नितीन कांबळे कडा (बीड) : चालकाचा ताबा सुटून अनियंत्रित टेम्पो आठवडी बाजार घेऊन गावाकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहणाऱ्या तरुणाच्या अंगावरून गेल्याची घटना २ एप्रिल रोजी केरूळ येथे झाली होती. यात जखमी झालेल्या तरुणाचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सत्यवान बबन साबळे (३२) असे मृताचे नाव आहे. पत्नीच्या समोरच या तरुणाच्या अंगावरून टेम्पो गेला होता.

आष्टी तालुक्यातील केरूळ येथील सत्यवान बबन साबळे हे पत्नीसह  रविवारी कडा येथील आठवडी बाजारासाठी आले होते. त्यानंतर केरूळ गावाकडे जाण्यासाठी चौकात दोघेही रिक्षाची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, बावर गॅस एन्जसीचा सिलेंडर घेऊन जाणारा टेम्पो या मार्गावरून जात होता. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टेम्पो सत्यवान यांच्या अंगावरून गेला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. आज पहाटे उपचारादरम्यान सत्यवानचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी,दोन मुलं, भाऊ असा परिवार आहे.

पत्नीच्या डोळ्यादेखत अंगावरून टेम्पो आठवडी बाजार घेऊन पती,पत्नी केरूळ गावाकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबले होते. अचानक भरधाव टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या सत्यवान यांच्या अंगावरून गेला. पत्नीच्या डोळ्यासमोर दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर चालक न थांबता वाहनासह पसार झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड